कोजागिरीचा चंद्र
कोजागिरीचा चंद्र
कोजागिरीचा चंद्र
माझ्या ह्रदयात वसलेला...
रोज दिसतो सुंदर तरी
आज तेजाने न्हाहलेला....
नाते त्याचे नी माझे
ऋणानुबंधात घट्ट बांधलेले...
पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनेच ते एकवटलेले...
लख्ख प्रकाशाने आज सजेल धरती...
लक्ष्मीची बरसात होईल प्रत्येकाच्या अंगणी...
मंद वाऱ्याचा हवेत पसरेल गारवा...
शितल चंद्राच्या किरणांचा केशर दुधात येईल गोडवा...
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची घेऊ या अनुभूती...
सौख्य, मांगल्य, समृध्दी आणि दीर्घायुष्याची सर्वत्र पसरेल सुंदर अशी कहानी...
उल्हास आणि आनंदाने
साजरा करु या कोजागिरीचा सोहळा...
मना मनामध्ये रुजेल आपुलकीचा गोडवा...
