STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

4  

Anupama TawarRokade

Others

कोजागिरी पोर्णिमेची महिमा

कोजागिरी पोर्णिमेची महिमा

1 min
302

शारदीय पोर्णिमेस

गळी शुभ्र वैजयंती

कान्हा रचे रासलीला

राधा गौळणी खेळती


चंदेरी प्रभा चंद्राची

जणू चांदीची सुमने

पसरले अंगणात

तजोमय तारांगने


दुग्ध शर्करेचा मेळ

चंद्र हा प्रकाशमान 

महत्त्व आयुर्वेदात

 दुध अमृतासमान


कोजागिरी पोर्णिमेची

महती ही प्रचलीत

देवी लक्ष्मी विवरते

कोण जागे या रात्रीत


सुख संपत्ती मिळते

लाभे आशीष तयास

दिप दारी उजळता

नमस्कार हो चंद्रास


Rate this content
Log in