STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

*कोजागिरी पौर्णिमा

*कोजागिरी पौर्णिमा

1 min
1.3K

कोजागिरी पौर्णिमा आली हो आली

अंगणी माझ्या अमृत दुधाची तळी 

अश्विन महिन्यात शरदाचं चांदणं 

मोहक आकांक्षेनी स्फुरली कळी।।


आकाशातल्या शरदाचं चांदणं 

मन हृदयात या आभाळ दाटली 

अंगनात मांडली मी दुधाची कढई

गोडगोड दुध त्यात मेवे मी टाकली ।।


सोहळा हा आनंदाचा खेळीमेळीचा 

शुभ्र प्रकाशाने मने कशी लखलखली

घोट-घोट दुधाने सु-समाधानाच्या राशी 

समृद्धीची सुमनफुले अशी उधळीली।।


कोजागिरी ही बाई उत्कर्षाची 

अश्विनी सुमने मी आज उधळीली

सुगंधीत अत्तराने धुंद झाली

पृथ्वी आसमंत गंधारूनी लाजली।।


दिली तारकांनी आल्हादक देनी

भरूनिया ओंजळ सु-मंगल हर्षानी

चंद्र अन तार्‍यांचा खेळ हा निराळा

जमलीया मैफल अमृतरस प्राशुनी।।


दूध पिता नष्ट होई रोगराई

शक्ती येई अंगी सुचे नव्या वाटचाली

सौंदर्य वाढायला आहे भरपाई

औषधीच दिव्य आहे चंद्रकिरणावली।।


Rate this content
Log in