कन्यादान
कन्यादान
1 min
289
काळजाचा तुकडा जेव्हा
निघाला सासरी जायला
पापणीत लपलेले अश्रू
नव्हते कुणी सावरायला
मन तीळ तीळ तुटते माझे
जाण्याने तुझ्या सासरी
रिकामीच उद्यापासून माझ्या
घरची असेल ओसरी
कानावर ऐकू येतील रोज
बोबडे तुझे पण, गोड बोलणे
आणि मोहवून टाकणारे
अंगणातून दुडू दुडू चालणे
घरात असतांना तू कशाचीच
चिंता नव्हती आम्हाला
परक्या वैभवात तू खंबीरपणे
सांभाळून घेशील स्वतःला
कमी नको पडू देऊ कधी
तुझ्यातील बाणेदारपणा
माहेर ते सासर समजून
जप तुझा तू करारीपणा
सत्य ,असत्याची कर पारख
मला वाटेल तेव्हा अभिमान
आणि सुख लाभेल मनाला
केले म्हणून मी कन्यादान
