कन्यादान
कन्यादान
1 min
507
ज्याचे घरी कन्यारत्न
तोची खरा भाग्यवंत
हाक मारीसी कधी बाबा म्हणोनी
वाट पाहतो माझ्या चिमुकल्या
मुठ आवळुन बोट धरतेस जेव्हा
जग जिंकल्याचा भास होतो मज तेव्हा
मुलगी नाही तु श्वास माझा
दिवसगणिक दिवस गेले
लेक झाली मोठी कोणा न कळले
लग्न जुळले मंडप सजले
अश्रु मनी दाटले
आली वेळ आता कन्यादानाची
लेक माझी लाडाची चालली सासरला
आठवण येईल ना छकुल्या
ह्या भाभड्या बापाची तुला
माय चा जीव असा व्हावा
जसा काळजातला ठोका चुकावा
