कन्यादान
कन्यादान
1 min
459
कन्या दान,
कन्येचे दान,
नाही मनाला पटत
ही प्रथा, ही रीत ,
नाही मनाला रुचत.
कन्या घरची लक्ष्मी,
घरची बेटी, धनाची पेटी
अंगणातली पवित्र तुळस
देवापुढची अखंड तेवणारी ज्योती.
माझी कन्या माझा जीव की प्राण
माझ्या कुटुंबाची लखलख चांदणी
घरातले निखळ -निरागस सौन्दर्य
मनातली गोड गाणी- मधुर वाणी .
हे सारे दान करायचे?
आयुष्य खर्ची घातले
कन्येच्या गाली हसू फुलण्यासाठी
म्हणून कन्यादान वाटते सजा.
ही अग्नी परीक्षा नको देवा मारू माथी
वेगळा पर्याय असुदे वाटे मज फार भीती.
