कन्यादान !!
कन्यादान !!
मन बापाच हुरहुरू लागतय
जसं लेकरू त्याच वयात येतय
लेक लाडाची मोठी होतेय
ह्रदयी धडधड वाढू लागतेय
आठवणींच्या हिंदोळ्यांवर
लेकीचे बालपण सरकतेय
अल्लड निरागस मुरडणे
छान नटणे डोळ्यात तरळतेय
लेकीचे लाघवी बोलणे
खळखळून हसणे आठवतेय
अन् तिची कूस उजवायच्या
कल्पनेने डोळ्यांत पाणी दाटतेय
लेकीस योग्य वर शोधून
सुखी संसारात सोडायचय
कन्यादानाच्या चिंतेनेच तर
मन देखील गहीवरलय
परक्या घरी पाठवणी नंतर
एकाकीपण येवू नये वाटतय
नेहमी प्रेम, सदभाव, सदाचार
मिळण्याची चिंता ग्रासतेय
कन्यादानाच हेच तर शल्य
पित्याच्या मनात सलतय
वियोगाच्या जाणिवेनेच तर
बापाच ह्रदय आक्रंदतय !
