STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

कन्या का करावी दान?

कन्या का करावी दान?

1 min
301

लाडकी पोटची कन्या का?

द्यावी लागे दुसऱ्यास दान!

काळजाचा तुकडा आपला,

वाढवण्यास दुसऱ्याची शान!!१

कन्या तुळशीवृंदावनाची पणती 

देणे कठीण जरी परक्याचे धन!

ठरवूनच मनाशी तिला पाहुणी

राहावे लागते गप्प मारीत मन!!२

संस्कार,शिक्षण देऊन तिला

लग्नकार्य पाडत राहतात पार!

सासरी तिला पाठवल्या नंतरच

बंद का होत जाई माहेरचे दार!!३

एकदा आपण केलेलं दान जसं

म्हणे मागता येत नसते ना परत!

तद्वत कन्यादानाने माहेरालाच ती

पारखी गृहित मनी नाही ना धरत!!४

जरी ती असते आपली सोनपरी 

तरी तिला क्षणात विसरावे लागे!

रक्ताने घट्ट विणलेले मायेचे पाश 

सुटतील तरी कसे रेशमांचे धागे!!५

तुळशीला ही दुसरीकडे रुजण्यास

द्यावाच लागतो ना काहीतरी वेळ!

हाडामासाची लेक सासरी देतांना

माहेरच्यांना कसा साधवेल मेळ?!!६

नसे तो त्यांच्यासाठी भातुकलीचा

बालपणीचा मांडलेला डाव काही!

सासरी जाणारी लेक मायबापांना

लपवतांना अश्रूंचे कढ हळूच पाही!!७

देण्यास जगात इतके अवघड दान 

दुसरे काही असणेच शक्य नाही!

लेकीनं भरलेलं घर रिकामं करून

दुस-यांचे घर भरुन देणं सोपं नाही!!८



Rate this content
Log in