कंठात सूर कोठे?
कंठात सूर कोठे?
1 min
584
सांगा अरे सुखांनो गेलात दूर कोठे?
गाऊन दुःख सारे, कंठात सूर कोठे?
हातास काम नाही पोटात भूक मोठी,
शेती पुरात गेली, जावा मजूर कोठे?
साठून ठेवलेले गेले सरून सारे,
विझल्या चुलीत आता, होणार धूर कोठे?
पैसा तिथेच जातो ज्याच्याकडेच आहे,
निर्धन तसेच खाली, होतो कसूर कोठे?
माणूस माणसाला पाण्यात पाहतो का?
त्याच्यासमान कोणी, आहे असूर कोठे?
