कळत नाही मला
कळत नाही मला
1 min
347
कळत नाही मजला, आज मला काय झाले
कारण नसताना डोळे का भरून आले
डोळ्यातला आसवांना थांब कसे म्हणावे
मनातल्या आठवणींना मागे का ओढायचे
कळले मला कारण ह्या वाहणाऱ्या आसवांच
तुझ्या आठवणीतच तर ते आले ना सांगताच कळले
वाहू दिले मी माझे अश्रू, त्यांना थांब नाही म्हंटले
तुझ्याशिवाय रमत नाही हे त्यांनासुद्धा कळले
आता तुझ्या आठवणीत अश्रूच माझे झाले
प्रत्येक क्षणी ते माझ्या डोळ्यात माझेच होऊन राहिले
