कळी बहरली बघ
कळी बहरली बघ
1 min
123
जीवनी ही कळी बहरली बघ
यौवनीं ती आता उमलली बघ !
देह गंधात हरवला नुसता
वाद खुलती सभा भरवली बघ...!!
स्वैर अनुवाद करुनही इथली
माणसे आजही भटकली बघ...!!
संगतीने तुझ्याच चालावे
चालतांना निवड ठरवली बघ....!!
माय चिंतेत फार मुरली रे
जिंदगी जी तिने भरडली बघ...!!
दाट संशय जरा मनी भरला
वाट रानातली गवसली बघ....!!
मौन पण पाळले हवेने त्या
चाल नकळत तिची बदलली बघ....!!
