किनारा
किनारा
1 min
708
किनाऱ्यावर उभा राहून
समुद्रातील पाणी पाहतो
तेव्हा सर्वत्र पाणीच दिसते
त्यात निळे निळे आकाश
दूरवर काही दिसत नसते
पाण्याला असतो किनारा
लाटा जाऊन परत येतात
समुद्रातील चढ उताराचा
एक अनुभव घेऊन जातात
मानवी जीवन आहे मुळी
अथांग खोल दूरवर पसरलेल्या
समुद्रातील पाण्यासारखे
जोरजोरात आवाज करीत
किनाऱ्यावर धडकणाऱ्या
सागरातील लाटासारखे
अनेक सुख दुःख येतात
जीवनाची परीक्षा घेतात
यात उत्तीर्ण झालेले लोकंच
यशस्वी जीवन जगतात
संकटाला घाबरणारे लोकं मात्र
स्वतःचे धैर्य गाळून बसतात
पाण्याबाहेरील माश्यासारखे
तडफडून मरून जातात
