STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

किमया शब्दांची

किमया शब्दांची

1 min
280

उचंबळून यावं भावनांनी

अन् बरसावे सरी बनून शब्दांनी..


मन:पटलावर तरंगत्या भावना,

मग अलगद उतराव्यात...

शब्द बनून लेखणीतून,

झरझर झराव्यात...,

पानावर ओघळाव्यात...!


मनाचं आभाळ आता मोकळं व्हावं!

लेखणीतून माझ्या ,

तुझ्या मनात उतरावं....

अन् एका अवचित क्षणी,

ते तुला तुझंच वाटावं.......


हीच रे ती किमया !

किमया भावनांची...

किमया शब्दांची....

किमया लेखणीची...

मनातलं मनाला पोचवण्याची....!


Rate this content
Log in