खवय्येगिरी
खवय्येगिरी
1 min
451
आठवते आज ही मला
त्या रस्त्यावरून जाताना
पाणी पुरीचा गोबरा तोबरा
तोंड लपवून खाताना
दूरच्या चौकातूनच सुटायचं
आमच्या तोंडाला पाणी
गाड्याजवळ पोहोचल्यावर
आपोआप सुचायची गाणी
गोल गप्पे खाल्ल्यावरचं
कळाली आम्हास खवय्येगिरी
इकडे तिकडे बघत शेवटी
हळूच मागायचो मसाला पुरी
नुसतं आठवलं तरी चव
जीभेवर अजून रेंगाळते
पोळी भाजी म्हंटलं तरी
मन उगीचच पेंगाळते
चोखंदळपणे जगताना
करून घेतले जिभेचे चोचले
दुखावले मनास जरी कोणी
पाणी पुरी खाऊन सोसले
