खुल्या आसमंतात
खुल्या आसमंतात
1 min
604
खुल्या आसमंतात या
विरघळले स्वप्न माझे
मुक्त संचार करण्यासाठी
दरवळले श्वास माझे
खुल्या आसमंतात या
स्वच्छंदी प्रतिबिंब माझे
वाऱ्यासवे बावरले
मन चिंब-चिंब माझे
खुल्या आसमंतात या
सुखाच्या लहरी सुरेल
नादमधूर संगीताचा
आसमंतात उरेल
खुल्या आसमंतात या
मन पाखरू होऊनी
फुलासंगे गूज त्याचे
झंकारले काननी
खुल्या आसमंतात या
भाव विश्वाचे रंगले
तुझ्या रंगी रंगूनी
अवघे विश्व माझे बनले.........
