खुलासा
खुलासा
1 min
276
आज केला खुलासा फुलाने
त्याच्या न उलघडणाऱ्या त्या कृतीचा..
अन् कळून चुकले
तसा नव्हताच कोणता मुद्दा
त्याच्या मनाच्या स्वीकृतीचा..!!
मग का बरे पाळले असावेत
भ्रमराने सारेच भ्रम मनाचे..
फुलाच्या मधुर हसण्याचे
आणि त्याच्या मोहक दिसण्याचे..?
हे कसले वेड असावे फुलांचे?
अंधार दाटून येताच
भ्रमरास कवेत घेऊन
नकळत मिटून घेण्याचे..!!
