STORYMIRROR

Nandini Menjoge

Others

3  

Nandini Menjoge

Others

खरंच, मीच ती नदी... ?

खरंच, मीच ती नदी... ?

1 min
277

निर्मळ तेनं वाहत होती.. 

गुण्यागोविंद्याने नांदत होती..  

शुभ्र पाण्याच्या कित्येक लाटा, 

खळखळून वाट तुडवीत होती !!


एकात्मतेचे स्वर उधळीत होती.. 

पवित्र्यात सदैव नाहत होती.. 

खोडकर त्या बाळक्रीडांची साक्ष, 

नागमोडी प्रवाह गुंफीत होती !!


पथिकांच्या वाटेची सखी होती.. 

जलचरांची निश्चिन्त खात्री होती.. 

जीवनाची ऐट मिरवीत कायम, 

निःस्वार्थ जीवन जगत होती !!


जलश्रुष्टीत अबोल जीव गुदमरतो, 

तृष्णेने बोलका जीव ही संपतो, 

घृणा वाटते माझीच मजला, 

एवढाच प्रश्न जीव घेतो... 

    खरंच, मीच ती नदी... ? 



Rate this content
Log in