खरं प्रेम
खरं प्रेम
वेलीवरचं फूल तोडण्याइतकं
सोपं असतं वरवर ते दिल तोडणं|
तेच फूल देऊन करू पहातात ते
एखाद्या मुलीशी दिल जोडणं ||१||
ह्यांचं दिल दिल नसतं हॉटेलिंगचं
गलेलठ्ठ बिल असतं |
अन्यथा तिला असं वापरून
चुरगाळून फेकून दिले नसतं ||२||
खर तर प्रेम म्हणजे प्रेमच असतं|
एकमेकांसाठीच उरायचं असतं||३||
राजरोस असं प्रेमाचं प्रदर्शन
गावभर मांडायचं नसतं|
एकमेकांच्या भल्यासाठीच
गावाशीही भांडायचं असतं ||४||
आपलं घर शेवटी आपणच
ते सावरायचं असतं|
दोघांनीही मग वासनांना क्षणिक
आवरायचं असतं ||५||
निकोप समाज रचनेसाठी
बलिदान ते करायचं असतंं|
स्वार्थापेक्षा केव्हाही समाजहित
रक्षण करायचं असतं ||६||
आपलं चांदणं आपण होऊन
आकाशात पसरायचं असतं|
असत्य स्वप्नील भासलं तरी
खरं करुनच बघायचं असतं ||७||
आपल्याने हे होणार नसलं तर
विनाकारण प्रेम करायचं नसतं|
मनात सारं सामावून घेऊन
दिलदारपण धरायचं असतं ||८||
एखादीच्या भावनांशी खेळून
यांचा होतो छानच टाईमपास|
रुपावर भाळलेली तीच सत्य
उमगलता आवळते गळफास ||९||
रोडरोमियोंचा खेळ तर एखादीचा
त्यामुळे जीव जातो|
Valentine's day चा अखेरीस
चुकीचाच संदेश जातो ||१०||
