STORYMIRROR

Suhas Bokare

Others

3  

Suhas Bokare

Others

खरे हसावे

खरे हसावे

1 min
239

जुने आता पुसावे.

नवे आता हसावे.


हजारो दुःख येवो,

तरी नाही रुसावे.


अश्रुंना सांग त्यांच्या,

घरी त्यांनी नसावे.


सवे ह्या आठवांच्या, 

विषाने का वसावे? 


करांच्या रेष रेखा, 

तपासाया बसावे.


भविष्याचे रकाने,

तपासूनी फसावे.


सजूनी लाज आली,

कसे गाली ठसावे?


तुझे ते नेत्र ओले... 

~हसू खोटे असावे.


हळव्या ह्या सुखांना

खरेखूरे दिसावे.



સામગ્રીને રેટ આપો
લોગિન