STORYMIRROR

भास्कर आग्रे

Others

3  

भास्कर आग्रे

Others

कहर...कोरोनाचा

कहर...कोरोनाचा

1 min
228

कोरोनाची आली मोठी लहर

नावानेच गाजतयं ते शहर

कोणी दिसे ना तो बाहेर

केलाय म्हणे कोरानाने कहर

आयुष्याचा खेळ खंडोबा झाला

सुखी संसार तो उघड्यावर आला

नव्याने संसार उभारु लागला

काटेकोर त्याने नियम पाळला

महामारीने उपासमार ती झाली

सामान्य जनतेला नाही कोणी वाली

पोटाची खळगी भरण्या निघे बाजारी

निराश मनाने परते अपुल्या दारी

कामधंदा सर्व गमावून बसला

कोरोनाच्या भोवऱ्यात तो गवसला

झुंज देत देता अपयशी ठरला

घरचा कर्ता करविता गमावला


Rate this content
Log in