खिडकीतून
खिडकीतून
तो बोलत नाही
विचारलं, तरी काही सांगत नाही
या दुनियेतला आहे,
असं वाटंतच नाही
त्याच्या वागण्यावरून तर
काही समजतच नाही
मनाची दारं,
आतून घट्ट लावून घेतलेली
मग मी खिडकीतून आत उतरायचं ठरवलं
एकामागून एक
त्याच्या कविता वाचत गेले
तेव्हा मग कवी
तळहातावरच्या स्फटिकासारखा
सगळ्या बाजूंनी लख्ख समजायला लागला
अगदी आतल्या गाभ्यासकट…
