तुझ्या रूपाचं चांदणं
तुझ्या रूपाचं चांदणं
1 min
524
तुझ्या रूपाचं चांदणं,
सावरून घे गो बाय,
चांद उतू जाईल गो
मग करशील काय?
तुझ्या रूपाचं चांदणं,
बघ झरे झुरुमुरू
दृष्ट लागेल कुणाची
लिंबलोण हे उतरू
तुझ्या रूपाचं चांदणं,
आग, रेशीम, सुवास,
असे भाग्यात कुणाच्या
जडावून जाती श्वास
आता एकच सांगणं,
बाई, ध्यानी ठेव, जाण
सांभाळून गं शिंपण,
तुझ्या रूपाचं चांदणं...
