बरे नव्हे (गजल)
बरे नव्हे (गजल)
1 min
221
ज्याला त्याला दु:ख सांगणे बरे नव्हे
प्रेमाचीही भीक मागणे बरे नव्हे
आरंभीचा कोण? कोठला ? इथे कसा ?
आता याला जीव लावणे बरे नव्हे
रात्री साऱ्या गंधमाखल्या जरा जरा
स्वप्नांनीही भेट टाळणे बरे नव्हे
चंद्रामागे जात चांदण्या भरातल्या
रात्रीनेही फार जागणे बरे नव्हे
तुम्ही सारे बोलघेवडे असा जरी
म्हाताऱ्याला चीड आणणे बरे नव्हे
लाथा खाणे मान्य का बरे तुला तरी ?
खुर्चीसाठी पाय चाटणे बरे नव्हे
हाका येती लांब कोठुनी दिगंतरी
अज्ञाताला साद घालणे बरे नव्हे
