खिडकीत डोकावताना
खिडकीत डोकावताना
1 min
388
सकाळी पटलावर
भरपूर खिडक्या उघडल्या
काय काम करायचं
क्रमवार याचा लावला
एका खिडकीत बघायचं
कामाचं वाटल्यास कॉपी करायचं
दुसऱ्या खिडकीत
पेस्ट करायचं
अश्याच एकेका खिडकीत डोकावत राहिले
शोधत काही हाती लागतं का करत
कधी न कळत हाती लागत राहिले
तर कधी नको नकोसे सामोरे आले
एका खिडकीतुन दुसऱ्या खिडकीत
डोकावताना सरला दिवस मस्त मजेत
