खिडकी
खिडकी
1 min
436
आज सकाळी पुन्हा एकदा
खिडकीत ती दिसली
कटाक्ष टाकून हसत तिने मग
खिडकी बंद करुन घेतली
उगीच आले मनी असे का
वेडी माझ्या प्रेमात पडली
टपली मारुन हळूच डोक्यात
मी त्या विचारांना वेसण घातली
कशात आता लक्ष लागेना
ही कसलीशी नशा चढली
मग तर वाटले ह्या हृदयालाही
तिच्या प्रेमाची भुरळ पडली
थंडीमधल्या टिपूर चांदणी
आता रातही वेडी सजली
सुधाकराच्या मंद प्रकाशी
ती मज ताऱ्यासम भासली
थंड वाऱ्याची एक झुळूक येऊनी
आता डोळी झापडे आली
पुन्हा सकाळी तिला पाहण्या
अवखळ रातही निद्रिस्थ झाली
