STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

खेळूया होळी

खेळूया होळी

1 min
191

वसंताच्या

स्वागतास.

सृष्टी झाली

सज्ज खास.


नवतीचा

साज ल्याली.

पालवीही

हसे गाली.


पलाशही

हर्षे खूप.

पालटले

त्याचे रूप.


केशरी तो

झगा भारी.

पळसाच्या

देहावरी.


तप्त ज्वाला

जणू रानी.

पलाश तो

उभा मानी.


रंग चढे

पळसाला.

होलिकेचा

सण आला.


आला आला

सण होळी.

पुरणाची

खाऊ पोळी.


एकमेका

रंग लावू.

आनंदाने

चिंब होऊ.


कोणताही

असो रंग.

रंगवून

टाकू अंग.


रंग सारे

ठायी ठायी.

विखुरले

होळीपायी.


दुर्गुणांचा

करू नाश.

वाईटाचे

तोडू पाश.


दूर ठेऊ

द्वेष , गर्व.

एकोप्याने

राहू सर्व.


बात एक

ठेवा ध्यानी.

नका करू

मनमानी.


करू नका

वृक्षतोड.

वापरावं

पाणी थोडं.



साहित्याला गुण द्या
लॉग इन