खेळणी
खेळणी
1 min
186
मातीची असो की प्लास्टिकची
रडणे थांबवते बरं ही बाळांची
मुलगा मुलगी नसेच भेदभाव
जाती धर्माचे हिला नसे भ्याव
मानीत नाही गरीब व श्रीमंत
आनंद वाटे तिला खेळविण्यात
काही फरक पडत नाही ऋतूंचा
उन्हाळा हिवाळा अन् पावसाचा
आजिबात जागेचा नसतो कधी मेळ
जिथे मिळेल जागा मांडायचा खेळ
वेळ काळाचे तर मुळीच भान नसणं
अर्ध्या रात्री उठून खुशाल खेळणं
यात्राजत्रेत हमखास नजरेस पडे
घेण्यासाठी मग ढसाढसाच रडे
