खेळ
खेळ
1 min
227
खेळ खेळून
डाव रंगला
खेळ खेळात
जीव दंगला ॥
नवे नवे त्यात
डाव मांडीती
खेळा मधले
ते संगती ॥
टाकली खेळी
अशी मजवरी
खेळ खेळता
त्या वेळी ॥
खेळीत त्यांच्या
मी अडकलो
हार मानीत
असा मी हरलो ॥
असेच आयुष्यात
माझ्या झाले
डाव वैऱ्यांनी
मज वरी केले ॥
आपुले म्हणोनी
मज मारीले
खेळी करूनी
फासा चढविले ॥
खेळ खेळता
डाव रंगला
खेळून खेळ हा
जीव व्याकुळा ॥
