STORYMIRROR

jaya munde

Others

3  

jaya munde

Others

खेळ मांडला

खेळ मांडला

1 min
141

   जीवनाच्या पटावर

   असा खेळ मांडला,

   हार-जीतविनाच असा

   डाव इथे रंगला....


   आपलेच जीवलग कसे

    प्रतिस्पर्धी संघात निवडले,

    घालमेल होऊनी अंतरी

    सारे उत्साहच मावळले...


    संस्कारच होते ज्यांनी

    अनिष्ट होते टाळले,

    आपले म्हणून मानले

    त्यांनीच किती छळले...


    घास मुखाचा हिरावूनी

    खो दिला विश्वासाला,

    क्षणात सारे विश्व संपूनी

     स्थान मिळाले वैराला...


    जन्म फुकाचा एकदाचा

    नको गर्वाचा स्पर्श मनी,

    बेधुंद कवटाळून क्षणांना

    सजवू जीवन नाना रंगांनी..


Rate this content
Log in