खेळ आयुष्याचा बघता
खेळ आयुष्याचा बघता
1 min
237
खेळ आयुष्याचा बघता
आसवं ही शुष्क झाली
मिटण्या पापणी ही करूनी बघते
आसवांना ना कळले काही
सुखाची वाट बघता
कर्ण माझे बधीर झाले
पर कुणाचे हे अंत्यशब्द
ना पडले माझ्या कानी
ही वाट आहे माझी काटेरी
घायाळ झाली मी ह्या काट्यावरी
किती वाट पाहू मी सुखाची
आस ही लागली मनी
