STORYMIRROR

Anil Chandak

Others

4  

Anil Chandak

Others

खेड्यातले जीवन

खेड्यातले जीवन

1 min
200

पहाटेच मंदिराच्या, भूपाळीने जाग येते!

वासुदेव गाणी गात, आगमन गावी होते!!1


सडासंमार्जन रांगोळी, अंगणात छान असे!

घरोघरी माणुसकी, मात्र पदोपदी दिसे!!2


कोंबडा आरवला की, दूध गायींचे काढती!

शेणकुर करून बाया, कामामागे लागती!!3


बाप्ये दूध घेऊनी मग, डेअरी गाठतात!

बाया न्याहरीसाठी, चुलीवरती जुंपतात!!4


स्नान वगैरे करूनी, देवदर्शनी म्हातारी!

तरणी तंबाखू चघळत, जाती पारावरी!!5


रोजंदारी माणसे शोधून चाले खुरपणी!

शेतात निंदणी, येता लाईट देतात पाणी!!6


बैलांची जागा आता ती, ट्रॅक्टरने घेतली!

कृषी उत्पादनात तयाने भरच पडली!!7


माणसे ही निर्मळ मनाची, गाठ सज्जनांची!

जातपात भेदभाव, इथे काही नसतेची!!8


गावी राजकारण ही, आमदार करतात!

तरूण घेऊन हाती, काम साध्य करतात!!9


इथे तरूणांना सध्या, व्यसनांनी ग्रस्त केले!

कोणी शहाणेसुरते, शहरी कामांसी गेले!!10


जत्रा आणि तो तमाशा, यांना विशेष महत्व!

कुस्तीच्या ही आखाड्यात घुमे दाखवी कर्तृत्व !!11


Rate this content
Log in