STORYMIRROR

Latika Choudhary

Others

2  

Latika Choudhary

Others

कॅन्सर

कॅन्सर

1 min
2.8K


कॅन्सरचं निदान साऱ्यांना कळलं

'त्या क्षणी' साऱ्यांचं मन हळहळलं

नंतर हळहळण्याचे रूप बदलले

नात्यांचे रंग अन ढंग बदलले

जिव्हाळा कणव अन काळजी

पैसे उपचार सहानुभूती

हळूहळू sssहळूहळू sss

नंतर...?....?......?

नवऱ्याचा प्रश्न -

" खाण्यापिण्याचे ....म्हातारपणीचे

 कसे व्हायचे? स्थिरस्थावर होईपर्यंत

जगली असती तर बरे...."

शेजारणी..-"कायम कशी कागदात

असायची, धावपळ...दगदग...आतापिताच

करायची...'

मैत्रीणी- "खाऊन पिऊन घे ऐकलं नाही...

   मौज...मजा..सोनसुख भोगलं नाही...

   जाईन अशीच.....!

नात्यांचा प्रश्न -" बरी होती अडीअडचणीला

....तिच्या भावनाप्रधानतेचा फायदा व्हायचा....

अघळायची पघळायची लगेच ......!

नोकरीच्या जागी कुण्या मनानं म्हटलं.....

" ठीकच....एक जागा रिकामी..."

एकानं (मनातच) म्हटलं....

"बरेच...माझं रखडलेलं काम पुढे....."

........

संस्थेचं एक डोनेशन वाढलं....

कुणाला फरक पडतो 

आपल्या असण्याचा....नसण्याचा...?

होय ,पडला फरक

वर्गातून एक चिमुरडी पदराला धरून म्हणाली

.......

" मॅडम ,छान शिकवायच्या न तुम्ही ! 

जीव लावायच्या....

तिच्या डोळ्यातलं आसू अन स्पर्श

सार सार्थक करून गेलं...

उपरोधाचं हसू ओठावर विस्तारलं...

कारण.......

 .......कॅन्सर कल्पनेतला ,पण प्रतिक्रिया

वास्तव होती....

जगाची रंगछटा दाहक विस्तव होती.....!


Rate this content
Log in