कधीतरी हो मोरपीस
कधीतरी हो मोरपीस
1 min
122
मोत्याची सर होऊन
नुसतंच गळ्यात मिरवत
पडून राहण्यापेक्षा
कधीतरी हो
यत्किंचित हळुवार तलम मोरपीस
अन् घे अनुभूती स्वच्छंद उडण्याची
वाऱ्यावर स्वार होऊन, घाल गवसणी गगनास
बघ इतके करून प्रयास..!!
पुन्हा अवचित खाली येशील
तेव्हा कदाचित
नकळत पायदळी तुडवली जाशील
किंवा कदाचित
कोणीतरी उचलून घेईल हळुवार
जपेल कोणी मनाच्या पुस्तकात..
अथवा खोविल कोणी कान्हा मस्तकात..!!
इतके मात्र निश्चित
मग तुझे तुलाच कळेल
नाही रंजन काहीच मोत्याच्या मिरवण्यात
खरी गंमत आहे ती
नजाकतीने पिसाच्या उडण्यात..!!
