कधी वेळ मिळाला तर बघ....
कधी वेळ मिळाला तर बघ....
1 min
194
कधी वेळ मिळाला तर बघ,
आपल्या स्वतःच्या मनात डाेकवून,
कसं जीवन जगताे मारून मुटकून,
का घेताेय आपण हातचं राखून....
कधी वेळ मिळाला तर बघ,
दुसऱ्याच्या जीवनात ढवळाढवळ करून,
आपलेच म्हणणं खरं आहे म्हणून,
नेहमी संबंध घ्यायचे बघा ताणून....
कधी वेळ मिळाला तर बघ,
स्वतःबराेबर कर दुसऱ्याचा विचार,
करू नकाे स्वाथाॆसाठी भ्रष्ट आचार,
ताेंड दाबून सहन करताे बुक्क्यांचा मार....
