कौतुक...
कौतुक...
1 min
39
ज्या समाजात कौतुक, करणारी असतात माणसं,
त्याच समाजात उगवतात, नररत्नाची अनमोल कणसं
कामाबद्दल मिळालेली शाबासकी,उद्या दुपटीने कार्यरत होतो,
कौतुकाची थाप दिल्याबद्दल,त्याच्या मनात सन्मान बळावतो
नेहमीच्या बोलण्यात,कौतुकाचे शब्द पेरा,
मन जिंकण्याचा हा मार्ग, याचा वापर तुम्ही करा
यशाने मिळते कौतुक,थाप आपल्या पाठीवर,
उद्याचं यश पडते पदरात,या कौतुकाच्या शब्दावर
