STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

कैफियत..!

कैफियत..!

1 min
152

कैफियत..!


जागतिक व्यंगचित्रकार दिन

आज ज्याच्या मनातच साजरा झाला

कुंचल्याच्या किमयेची किमया

काय असते याचा प्रत्यय आला

सृजनशीलतेचा पुरता अनुभव

आज कनवटीशी बांधून घेतला

म्हंटले इतके अजाण पणाचे पीक

इतक्या कमी वेळात वाढेल

असे कधीच वाटले नव्हते

असेही दिवस पहावे जगावे लागतील

असे स्वप्न ही कधी पाहिले नव्हते

ध्येय मोठे उराशी बाळगून

रेघोट्यांनी रेघा रेखणार होतो

पण आज कुंचला रुसला

आणि कोरा करकरितच दिवस

कधी नव्हे ते साजरा झाला

हसवणाऱ्याला हसण्याचा अधिकार नसतो

हे काही खोटे नाही

व्यंगचित्रकराला आपल्या देशात

मान सन्मान मिळेल असे 

आजही मला वाटत नाही

तरीपण व्यंग चित्रकार

स्वतःहाचेच व्यंग चित्र रेखाटतो

आणि मनसोक्त हसत हसत 

आंनदाने स्वगृही झोपी जातो

स्वप्नात मग ती येते म्हणते

उठ तो कुंचला घे आणि

रेखाट काय रेखाटायच आहे ते

तो हसतो आणि कुंचल्याच्या

एकाच फटकाऱ्यात 

साऱ्या ब्रम्हांडात आंनदाचे 

कारंजे लीलया उधळतो

आंनदी आनंद पाहून खुष होतो

म्हणतो 

परमेश्वरा मला व्यंगचित्रकार बनवलास

खूप खूप छान केलंस

देवा साऱ्या आनंदाच आंदण देवून

तू मला जन्मोजन्मीचा ऋणी केलंस....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन