STORYMIRROR

Chaitrali Dhamankar

Others

3  

Chaitrali Dhamankar

Others

कायदा

कायदा

1 min
381

डोळ्यात तुझ्या तीच मादकता 

जशी होती कॉलेजमध्ये

नजरेत तुझ्या तीच ओढ 

जशी होती वर्गामध्ये।।


तुझ्या तिरप्या कटाक्षावर 

झाले होते कित्येक फिदा 

मी मात्र होतो घायाळ 

पाहून तुझ्या सगळ्या अदा।।


का नाही घेतलास पुढाकार 

जरी कळत नव्हते काही मला 

आपलाही संसार फुलला असता 

हक्काने घरी आणले असते तुला।।


आजही करतेस तेवढेच प्रेम 

जरी असलीस दुसऱ्याची 

मनात नसले जरी अंतर 

रेषा आड येते कायद्याची।।


Rate this content
Log in