काव्यमय कोडे
काव्यमय कोडे
1 min
276
लांबच लांब नाक माझे
म्हणती त्याला सोंड हो
माणसाचे शरीर माझे
प्राण्याचे आहे तोंड हो
तोंडाबाहेर आहेत सुळे
दोन कान पसरट हो
प्रथम पुजेचा मान मला
वाहन माझे मूषक हो
पार्वतीचा नंदन मी
कार्तिक माझा भाऊ हो
सांगा आता नाव माझे
मिळेल मोदक खाऊ हो
