काव्यछंद
काव्यछंद
1 min
430
काय तुझा तोरा अन्
किती न्यारे तुझे छंद
रूप तुझे वर्णिता ते
उठती शब्द तरंग...
संतांनी अभंगातुन
ईषास त्या आळविले
जात्यावरील ओव्यांनी
मळभ दुर सारीले...
गरजलीस थाटात
शहिराच्या पोवाड्यात
बागडलीस आनंदात
लहानग्यांच्या गीतात...
शृंगारलीस लावणीत
शब्दसाज तो लेवुूनी
आनंदे ठुमकलीस
लोक गीतांमधुनी...
हळव्या मनाने कधी
आर्त साद घातलीस
बेधुंद होऊनी कधी
प्रेम रंगी रंगलीस...
महती तुझी वर्णाया
बहुत मी बुद्धीमंद
शब्दसुमने उधळीता
प्रकटती काव्यछंद...
