काव्यांजली
काव्यांजली
1 min
19
उचलली लेखणी
मांडण्यास भाव,
अंतःकरण उलगडले
आज शब्दांत,
शब्द वेचले
रेखावयास तुला,
नकळत झाली
ही कविता तयार,
धावपळीचे हे सध्या
जनजीवन,
वेळ नाही वाचायला
एकमेकांचे मन,
म्हणूनी निवडली ही शाई
अन् हा पेन,
जे ओळखतील
हे अंतःकरण,
फक्त तेच इमानदार
प्रती या भावना..
म्हणूनी देवाने केली
काव्यांजली तयार,
जी ठरे प्रत्येक
मनाचा आधार,
जिथे रेखता येते
आपले भाव आणि विचार..
जिथे रेखता येते
आपले भाव आणि विचार..
