काव्यांगण
काव्यांगण
1 min
424
बहरे येथे दररोज
काव्यसखी या काव्यांगणी...
काव्य बत्तीशी सुलक्षणी
गजानने छत्तीसगुणी...
सरिते मिलन सागरी
ती प्रीत एकादशाक्षरी...
मनोगुण मेलनी भव्य
महान प्रज्ञा भावकाव्य...
पंचतत्वांची ही वैखरी
मोहक रोही पंचाक्षरी..
दुर्गुण सारे झडकरी
सद्गुणांची ही षडाक्षरी...
अष्टभुजांची शक्ती नारी
अष्टांग योग अष्टाक्षरी...
मधुररस गोफणी
कल्पने मोहरे लेखणी...
मनी सार्थक अभिमान
नित्यनवा इथे सन्मान...
काव्यफुले सुखे नांदती
धन्य धन्य इथली माती...
