STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

3  

Nurjahan Shaikh

Others

काव्य सप्ताह

काव्य सप्ताह

1 min
156

विशेष काव्य सप्ताहातून 

शब्द पंढरीचे वारकरी, 

भावना व्यक्त करे शब्दातून 

राजयुवा काव्य कुटुंब भारी. 


एकमेकांच्या परिचयातून 

ओळखीचा होई सोहळा,

प्रवास त्यांच्या लेखणीचा 

भर पडे ज्ञानात वेगळा. 


गुणांची उधळण झाली 

अद्याक्षरी काव्यलेखनात,

ज्यांची नव्हती माहिती 

त्यांनाही समजलो वाचनात. 


क्रमांक प्राप्त आवडत्या कविता 

वाचून कळल्या साहित्य प्रवास, 

जुगलबंदीत रंगून मजा वाटली 

वेळ वाढवून दिल्याने खास.


वेगवेगळे उपक्रम राबवून 

मोलाचा सप्ताह केला पार, 

देऊन आम्हास आदराचे स्थान 

आपुलकी, प्रेमाचे सुंदर हार.


Rate this content
Log in