STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

कार्यकारी पंथ

कार्यकारी पंथ

1 min
282

परंपरा आहे भक्ती भावाची

महाराष्ट्र भूमी साधू संताची

व्यथा मांडतो कार्यकारी पंथाची


घराणेशाहीची काठी

कार्यकर्ते तुमच्या हाती

निवडणूक जवळ आली

खुर्च्या चपला उचलायची

लावा तो डीजे म्हणायची

वेळ आली.....


चेहरा कुठे बदलतो

रंग बदलतो झेंड्याचा

चिन्हांचं काय?

लांडग्याबरोबर कुत्राही चालतो


तू तर भावाशी वैर करतो

नाती तोडून गठबंधन जोडतो

नेता षंढांचे टाळ वाजवत

वारी दुसऱ्या पक्षाची करतो

एका शब्दासाठी

बांधून आहे एकनिष्ठेशी


घराणेशाहीची काठी कार्यकर्ते

तुमच्या हाती


वचनपूर्ती गणपती

हे नाही महारथी

नवसाला निवडणूकीलाच पावतो

पाच वर्ष तु धावतो


वारकरी तू माऊलीचा

नाही तू या चोरांचा

श..शब्द भिंगुर

अमोल धों सुर्यवंशी


Rate this content
Log in