STORYMIRROR

Rakesh More

Others Romance

2.5  

Rakesh More

Others Romance

कारण मात्र रोमँटिक असतं

कारण मात्र रोमँटिक असतं

1 min
245


सकाळची शुद्ध हवा 

हे एक टॅक्टिक (tactic-युक्ती) असतं 

माझं जॉगिंग ला जाण्याचं 

कारण मात्र रोमँटिक (romantic) असतं


सकाळी exact सात वाजता

ती गार्डन मध्ये अवतरते 

गार्डन मध्ये अवतरून ती 

माझ्यावर उपकारच करते 

तिचं गार्डन मध्ये अवतरणं 

दृश्यच ते फँटॅस्टिक (fantastic-उत्कृष्ट) असतं 

माझं जॉगिंग ला जाण्याचं 

कारण मात्र रोमँटिक असतं


दहा राउंड गार्डनला 

नियमितपणे मारते ती 

प्रेमाच्या व्हायरस ने त्रस्त मला 

दर्शन देऊन तारते ती 

माझ्या मनाचं संतुलन मात्र

तेंव्हा इरॅटिक (erratic-अनिश्चित) असतं 

माझं जॉगिंग ला जाण्याचं 

कारण मात्र रोमँटिक असतं


नजरानजर करण्याचा प्रामाणिक 

प्रयत्न करतो मी 

खरं सांगतो तिच्यावर 

From the bottom of heart मरतो मी 

जॉगिंग चं तिचं शेड्युल मात्र 

बऱ्याचदा हेक्टिक (hectic-अतिव्यस्त) असतं

माझं जॉगिंग ला जाण्याचं 

कारण मात्र रोमँटिक असतं


वाटतं कधीतरी तिने

माझ्याकडे वळून बघावं 

<

p>नजरेत नजर सामावून 

एकमेकांकडे बघत बसावं 

हृदयात तिच्याप्रती जाणवणारं 

माझं प्रेम मात्र कॅंटिक (cantic-अतुलनीय) असतं 

माझं जॉगिंग ला जाण्याचं 

कारण मात्र रोमँटिक असतं


कसं तिला अप्रोच (approach) करावं 

डोकं काही चालत नाही 

तिला बघितल्याशिवाय 

माझं पान काही हालत नाही 

कितीही टाळलं तरी 

माझं वर्तन मात्र अँटिक (antic-विक्षिप्त) असतं 

माझं जॉगिंग ला जाण्याचं 

कारण मात्र रोमँटिक असतं


तिच्याशी बोलण्यास्तव काही 

कारण शोधावं लागेल 

नुसतं दुरून बघून तिला 

माझं कसं भागेल 

काहीही म्हणा ते दृश्य माझं 

माझ्यासाठी जेस्टिक (gestic-हालचालींसंबंधी) असतं 

माझं जॉगिंग ला जाण्याचं 

कारण मात्र रोमँटिक असतं


तिच्यामुळे माझा व्यायाम मात्र 

नियमित होत आहे 

तीच माझ्या फिटनेसचा 

एकमेव शुद्ध स्रोत आहे 

विचारांचं काहूर माझ्या

मनात मात्र हॅप्टीक (haptic-स्पर्शासंबंधी) असतं 

माझं जॉगिंगला जाण्याचं 

कारण मात्र रोमँटिक असतं


Rate this content
Log in