काळया मेघा
काळया मेघा
1 min
341
काळया काळया मेघा तू
थेंबा थेंबाने यावे
लाही लाही ही कांती
माघारी तू ना जावे
लागे तूला भेटावे
सार्या साठी झूरावे
कोणाच्या साठी तुला
देऊ आता मी पूरावे
वेडीपीसी ही मृदा
भेगा भेगा झाली
मोराच्या संगे तीने
नृत्य का हे पाहावे
रानाच्या पानामंदी
तुला पाहाते रे
मातीच्या वासामंदी
सांजवेळी भेटावे
