STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

काळ्या आईचं सपान...

काळ्या आईचं सपान...

1 min
346

काळ्या  मातीत  हिरवाई बहरली,

धरणी माई लई सुखावली,

वेल वेल लगडली थोडी लाजून झुकली,

काळ्या आईच्या कुशीत थोडी सुखाने रडली,

पाणी आल रानी वनी गात मोटेवरची  गाणी,

तरारली पुन्हा वेल झेप घेइ वरवर,

सूर्य आला घेउन मऊ रेशमी ते उन,

खुळ्या उनाड वाऱ्याची उगीचच भणभण.

त्याने केली भुणभुण ओल्या वेलीच्या कानात,

अन लाजेची हिरवाई आली हर एक पानात,

मग लगडली वेल कळ्यान फुलान,

फळ लागता फुललं काळ्या आईचं सपान !!


Rate this content
Log in