Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Others

1.0  

UMA PATIL

Others

कालची आणि आजची स्त्री

कालची आणि आजची स्त्री

1 min
17K


बाई बाई, येते मला आज लाज गं

छोटंसं बाळ, मोठंसं आभाळ माझं गं ||धृ||

घराच्या कामात रोज थकते मी भरपूर

विटाळ काळात सदा बसते मी खूप दूर

रांधणं, कांडणं, सारवणं करते नेमाने गं

चूल आणि मूल यातच संसार माझा गं ||१||

नखरा माझा जरा - जरा आहे लाजरा

साजणा माझा आणी मोगऱ्याचा गजरा

माझा जडला जीव पती परमेश्वरावरी गं

त्याच्याच सोबत सात जन्म मी राहते गं ||२||

थकून - भागून हात पुसते सुती लुगड्याला

शेतात राबतांना झोका बाळाच्या पाळण्याला

बाळ मोठा करण्याचे सुखी स्वप्न पाहते गं

दोनच हात मला, किती करू मी काम गं ||३||

तेव्हा होत्या सर्वच्या सर्व पारंपारीक गोष्टी

आता माॅडर्न टेक्नोलाॅजीने बदलली सृष्टी

बटण दाबून गॅस बंद, मिक्सर सुरू होई गं

फ्रिजचा थंडावा, एसीचा गार वारा झोंबे गं ||४||

बनुनी सुनिता विल्यम्स, आकाशी घेई भरारी

झोकात मी चालवते बुलेट, कार आणि फेरारी

सजणा आणि मी आहोत फेसबुक फ्रेंडस् गं

दिवस - रात्र मोबाईल वर बोलणे चाले गं ||५||

ऑफिसात मी मॅनेजर, घरची होम मिनिस्टर

मी कर्तव्यदक्ष मदर आणि लव्हली सिस्टर

एवढंसं माझं पिल्लू खेळे ऑनलाईन गेम गं

टेक्नोसेवी होऊन प्रगती माझी मी साधते गं ||६||


Rate this content
Log in