काळ
काळ
1 min
365
वेग वाऱ्याचा दिसलाच नाही
काळ निसटता दाखवत राही
काळ वेळेचे खेळ रंगले
उण्या दुण्यात सारे डुंबले
गरजेची टर उडवणारे पाहा
काळाचा वेग मोजत राहा
चक्र एक चाकं एक
रुतले सारे एकातून अनेक
दिशा,वेग, काळ बंद
धुरकट वाटा झाल्या मंद
