STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

2  

SANJAY SALVI

Others

काळ चक्र...

काळ चक्र...

1 min
408

काळ चक्र जर उलटे फिरवता आले तर,

मी नक्कीच तसे फिरवले असते,

गतकाळातील आठवणींची पिंपळ पाने पाहून,

भविष्य थोडे सुखद केले असते,

जुन्या गोड गोष्टीना उजाळा देवून,

कडू स्मृतींना पुसून टाकले असते,

काळ चक्र जर उलटे फिरवता आले तर,

मी नक्कीच तसे फिरवले असते,

भविष्यात डोकावण्यात काहीच अर्थ नसतो,

जे घडणार आहे ते चुकणारच नसते,

उद्या हा नेहमी उद्याच असतो,

म्हणून भविष्याला भविष्यावर सोडायचे असते,

काळ चक्र जर उलटे फिरवता आले तर,

मी नक्कीच तसे फिरवले असते,

जुन्या आठवणी अन गोष्टी आठवण्यात गम्मत असते,

दोन घटका विरुंगुळा अन न दिसणारी सोबत असते,

सोनेरी क्षण आठवून नवी उमेद घ्यायची असते,

म्हणूनच कधी कधी कालचक्र उलटे फिरवायचे असते,

काळ चक्र जर उलटे फिरवता आले तर,

मी नक्कीच तसे फिरवले असते.


Rate this content
Log in