STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

काहूर मनातले

काहूर मनातले

1 min
234

पहिली लेक खुशी झाली

सर्व आनंदाने मस्त खुलली.....


दुसरी लेक हर्षात जन्मली

 तिच्या कलेत सारी रमली....


दिवसामागून दिवस चालले

परत तिला दिवस राहिले....


नवरोबाने नऊ मास लाड केले

बायकोला खूपच खुशीत ठेवले....


परत एकदा लक्ष्मी जन्मा आली

नवरोबाची लाही लाही झाली....


रूसला जरा आता बायकोवर 

ताबा नाही राहिला हो मनावर.....


बायको आपली त्रासाने व्यापली

शस्त्रक्रियेने अती पिडीत झाली....


मुलगी दुसरे रूप आहे देवीचे

करूणा ,माया अन् ममतेचे....


जशी पोर होईल ना मोठी छान

तेव्हा दोन्ही घरचे दिवे लावेल महान...


काहूर तिच्या मनातले झाले जरा शांत

मन जे होते आत्तापर्यंत खूपच अशांत..


साहित्याला गुण द्या
लॉग इन